August 9, 2025

वरिष्ठ लिपिक पदभरतीची गुणवत्ता यादी प्रसिद्ध

  • लातूर (विमाका)- विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत लातूर विभागातील वरिष्ठ लिपिक संवर्गातील 14 पदांसाठी सरळसेवेची जाहिरात एप्रिल, 2023 ला प्रसिद्ध झाली होती. या वरिष्ठ लिपिक पदांसाठी घेण्यात आलेल्या पदभरती परिक्षेत किमान 45 टक्के गुणांची अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी 3 फेब्रुवारी ते 2 मार्च, 2024 या कालावधीसाठी कृषी विभागाच्या www.krishi.maharastra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतरिम निवडसूची व अंतरिम अतिरिक्त निवडसूची लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
error: Content is protected !!