माथाडी कामगारांचे बेमुदत ठिय्या आंदोलनाचा ३ रा दिवस…!!
संभाजीनगर (अविनाश घोडके) – माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत या प्रमुख मागणीसाठी, माथाडी कामगारांनी कामगार उपायुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलनाच तिसरा दिवस उजाडला आहे. बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनात शासकिय धान्य गोदाम,कारखाने,बाजार समिती इ. मधील माथाडी कामगार आंदोलनात सहभागी झाल्याचे पत्रकात नमूद केले आहे. न्याय्य व कायदेशीर प्रश्नासाठी हमाल कष्टकऱ्यांना वारंवार रस्त्यावर येवून आंदोलन करावी लागतात, ही लोकशाहीची शोकांतिका आहे असे उदगार, टेलिफोन कर्मचारी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस साथी रंजन दाणी यांनी काढले. आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे – माथाडी कायद्याची सार्वत्रिक – काटेकोर अंमलबजावणी करा, माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबीत प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत,शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांची सर्व थकबाकी वसूल करावी, शेतकऱ्यांचे शेतीमालाच्या हमी भावास कायद्याचे संरक्षण द्यावे,माथाडी कामगारासह शेतकरी व अन्य असंघटित व ग्रामीण कष्टकऱ्यांना म्हातारपणासाठी किमान ५ हजार रुपये पेन्शन सुरु करा,जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी किमान ४०% लेव्ही ची तरतूद करावी, महागाईचा मुकाबला जिल्हयातील माथाडी कामगारांना करता यावा म्हणून,तात्काळ किमान वर्षाला महागाई भत्ता देण्याची तरतूद करावी.. इ. मागण्यांचा समावेश आहे. २४ तासाचे साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनास श्रमिक मुक्ती दलाचे सुबेदार मेजर सुखदेव बन, व राजेंद्र डबीर यांनी पाठिंबा दिला तर यावेळी साथी छगन गवळी ,साथी प्रविण सरकटे, साथी देवीदास किर्तशाही, साथी जगन भोजने, साथी सचिन पगारे, साथी सार्जेराव जाधव, साथी अली खान, साथी शिवाजी राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
More Stories
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार
धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी राजाभाऊ गायकवाड यांची पुनर्नियुक्ती