September 24, 2026

गोविंदपूर येथील शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

  • गोविंदपूर (अविनाश सावंत ) –
    गोविंदपूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथामिक शाळे मध्ये बाल आनंद मेळावा व आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
    शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान मिळावे हा यामागील उद्देश होता. या आठवडे बाजारात विद्यार्थांनी सुमारे दहा हजार रुपयांची उलाढाल केली. विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फरसाण, किराणा सामान स्टेशनरी, कटलरी, हॉटेल,आदी वस्तूंची दुकाने थाटली होती.
    यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कनकावाड एच.पी.,दिवटे डी.बी., देशमाने बी.जे.,माळी आर.बी.,ढोणे एस.एच.,श्रीम. मुंढे के. के.,श्रीम.पाटील जे.डी.,श्रीम.होवाळ वी.जी., श्रीम.नागटिळक ए.जी.,श्रीम.जमाले आर.आर.शालेय समिती आध्यक्ष रूंदावनी मुंडे, कबन मुंडे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!