August 9, 2025

महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात शाळा संपर्क अभियानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  • लातूर (दिलीप आदमाने ) –
    महाराष्ट्र शासन,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर महाविद्यालय (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती), लातूर द्वारा आयोजित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शाळा संपर्क अभियानास महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
    या अभियानाची माहिती विज्ञान शाखा तथा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती समन्वयक डॉ. दीपक चाटे, कला शाखा समन्वयक कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, वाणिज्य शाखेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शिवप्रसाद डोंगरे, समाजकार्य शाखा समन्वयक डॉ. दिनेश मौने आणि संगणक शास्त्र विभागाचे राम पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, पर्यवेक्षक प्रा. शिवशरण हावळे आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या अभियानामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ची ऐतिहासिक पार्श्वभूमी, कार्यपद्धती, क्षमता, प्रक्रिया आणि अंबलबाजणी याविषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व साधन व्यक्तींनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
    या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी केला. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी कला शाखा समन्वयक प्रा. रवींद्र सोनोने, प्रा. वाणिज्य शाखा समन्वयक डॉ. टि. घनश्याम, प्रा. कल्पना गिराम, प्रा. रवींद्र सुरवसे, आनंद खोपे, राजाभाऊ बोडके, मदन कलबोने, शुभम बिराजदार, अनिल कोळे यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले.
    या अभियानाला कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक आणि ४५० विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!