तुळजापूर – दि.२८ जानेवारी २०२४ रोजी ठिक ११.०० वाजता तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृहात महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघाची केंद्रीय राज्य कार्यकारणीची बैठक केंद्रीय राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय राज्य उपाध्यक्ष दिलीप शितोळे,महासचिव प्रविण खाडे व प्रमुख सल्लागार रविंद्र वेंदे यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्रीय राज्य कार्यकारणी बैठकीचा मागील अहवाल वाचन संघटनेचे राज्य महासचिव प्रविण खाडे यांनी केले व त्यास सर्वांनी मते मान्यता देण्यात आली तसेच पुढील विषयावर चर्चा करण्यात आली. मागासवर्गीय कर्मचारी यांच्या अडी आडचणी व प्रलंबित प्रशन तक्रारी बाबत चर्चा करण्यात आली कर्मचारी यांच्या तक्रारी य काही अडी आडचणी असतील तर केंद्रीय राज्य उपाध्यक्ष दिलीप शितोळे यांच्याकडे लेखी सादर करण्यात यावेत,मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नती देण्या बाबत तात्काळ राज्याचे मुख्य सचिव व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन पत्र देण्यात यावेत बाबत चर्चा करण्यात आली,कास्टाईब महासंघाची अधिकत नोंदणी व रजिस्टेशन ज्या संघटनेकडे आहे. त्याच संघटनेला बैठकीसाठी बोलविण्यातयावे असे पत्र मुख्य सचिव विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत,कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करण्यात यावेत या बाबतीत मुख्यसचिव मुख्यमंत्री यांना पत्र देण्यात आलेले आहेत.कर्मचारी यांच्या आंतर जिल्हा बदली बाबतीत पन्न मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात यावे, काशिनाथ आंबादास माने यांची महाराष्ट्र राज्य कास्टाईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली,राहुल कांबळे यांची महाराष्ट राज्य कास्टाईब कर्मचारी अधिकारी कल्याण महासंघ धाराशिव जिल्हाध्यक्ष शिक्षण विभाग पदी निवड करण्यात आली,विनोद साबळे जिल्हाध्यक्ष व सतीश सुरते जिल्हा उपाध्यक्ष रोजगार सेवक संघटना पदी निवड करण्यात आली,रोजगार सेवक यांची शिक्षणांची शिक्षणअर्हता तपासणी करुनच इतर विभागामध्ये जेष्टतेनुसार नियुक्ती करण्यात यावी बाबत चर्चा करण्यात येऊन तसे पत्र मुख्यसचिव व मुख्यमंत्री यांना देण्यात यावेत. सदरील बैठकीसाठी केंद्रीय राज्य अध्यक्ष चंद्रकांत जाधव, केंद्रीय राज्य उपाध्यक्ष दिलीप शितोळे ,महाससचिव प्रविण आडे, प्रमुख सल्लागार रविंद्र बेंदे, जिल्हाध्यक्ष काशिनाथ माने,शिक्षण विभाग अध्यक्ष राहुल कांबळे, विनोद साबळे जिल्हाध्यक्ष रोजगार संघटना जिल्हाउपाध्यक्ष सतीश सुरते, रोजगार संघटना जिल्हाउपाध्यक्ष भागवत जेटीथोर,कार्याध्यक्ष एडके,कापसे, महिला अध्यक्ष लातुर विभागीय सचिव आर.पी.ढगे, जिल्हाध्यक्ष नागशेन कांबळे,जिल्हासचिव किशोर गायकवाड, अतिरिक्त महासचिव प्रविण सुर्यवंशी,संजय गायकवाड, उमरगा अध्यक्ष सरवदे आदींची उपस्थिती होती. शेवटी आयोजक दिलीप शितोळे यांनी आभार व्यक्त केले.
More Stories
श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या अफवा खोट्या
बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कविता कांबळे यांची बिनविरोध निवड
नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव