धाराशिव (जिमाका)-जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.तसेच जिल्ह्यातील वाशी,धाराशिव व लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेद्वारे महाराष्ट्र वैरण (निर्यात नियंत्रक) आदेश 2001 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील गुरांचा चारा / गवत / वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.तसेच हे आदेश आजपासून पुढील आदेश होईपर्यंत अंमलात राहणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व चारा उत्पादक,पशुपालक व चारा व्यावसायिकांनी जिल्ह्यातील पशुधनाच्या आवश्यकतेस विचारात घेऊन जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक वा विक्री करु नये.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला