कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणाची ज्योत पेटवु,बालविवाह समूळ मिटवू’ विशेष वार्षिक रासेयो च्या शिबीरामध्ये सोमवार दि. २९/०१/२०२४ रोजी ‘जनजागृति रॅलीचे’आयोजन मौजे.लोहटा (प.)येथे करण्यात आले होते.सकाळी या मोहिमेची सुरुवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली.यावेळी लोहटा(प) येथे ‘शिक्षणाची ज्योत पेटवु,बालविवाह समूळ मिटवू’ हा विषय सर्वसामान्य माणसा पर्यंत पोहचावे हा उद्देश समोर ठेऊन रासेयो विभागाकडून जनजागृति रॅली काढण्यात आली होती.या रॅलेमध्ये रासेयो च्या स्वयंसेवकानी या विषयी विविध घोषणा देऊन जनजागृति केली.यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतिराम जाधव,प्रा.मनिषा कळसकर तसेच प्रा.सुनिता चोंदे डॉ.हनुमंत माने,प्रा.शफीक चौधरी, डॉ. रघुनाथ घाडगे,डॉ.अनंत नरवडे,डॉ.महेश पवाररासेयो प्रतिनिधी गायत्री चोंदे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो विभागातील स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले