कळंब (राजेंद्र बारगुले) – शब्दपेरणी बालमनातील हा पुस्तक प्रकाशन सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे सांस्कृतिक सभागृहात उत्साहात संपन्न झाला. आश्रुबा कोठावळे लिखित ” शब्दपेरणी बालमनातील ” या बालकविता संग्रहाची महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांनी निवड करून यशोदिप पब्लिकेशन्स पुणे यांनी प्रकाशित केले आहे. ” शब्दपेरणी बालमनातील “या पुस्तकाचे प्रकाशन पुढारी न्यूज च्या असिस्टंट न्यूज एडिटर नम्रता वागळे ,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे व कवी, लेखक रविंद्र केसकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ.अशोक दादा मोहेकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.आश्रुबा कोठावळे हे संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर वि.कळंब येथे विशेष शिक्षक आहेत. ” शब्दपेरणी बालमनातील ” या पुस्तकातील कवितेत आनंद, संस्काराची शिकवण,लयबद्ध कविता,लहान मुलांना वाचनाची गोडी निर्माण करणाऱ्या,बडबडगीता सारख्या एकुण 78 कवितांचा समावेश असलेला बालकविता संग्रह आहे. या बालकवितासंग्रहाची प्रस्तावना बालसाहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त, सुप्रसिद्ध साहित्यिक आबा महाजन यांची आहे, तसेच शब्दपेरणी या पुस्तकाची पाठराखण बालसाहित्यिक बालाजी इंगळे यांनी केलेली आहे. तरी कार्यक्रमाला कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे,अध्यक्ष अशोक शिंदे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर,सतिश मातने,शितलकुमार धोंगडे, दिलीप गंभीरे,अमर चोंदे,बालाजी आडसुळ,सतिश तवले,रमेश आंबिरकर,शहाजी चव्हाण, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश गवळी यांनी केले तर आभार सतीश टोणगे यांनी मानले.यावेळी सर्वच पत्रकार, साहित्यप्रेमी व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले