August 8, 2025

श्री राष्ट्रसंत भगवान बाबा पुण्यतिथी उत्साहात साजरी

  • कळंब-संत भगवानबाबा प्रतिष्ठान कळंब आयोजित भगवानबाबा पुण्यतिथी सोहळा दि.२८ जाने २०२४ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    सकाळी मान्यवरांच्या शुभहस्ते भगवानबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.प्रतिमा पुजनानंतर सकाळी जेष्ठ मंडळीच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला.शोभा यात्रेत सुंदर सजवलेल्या रथातून संत भगवानबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.भगवे झेंडे,ज्ञानोबा तुकोबांच्या नामस्मरणाने वातावरण भगवेमय झाले होते.ठिक ठिकाणी शहरातील मान्यवरांनी रथयात्रेमध्ये भगवान बाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.शोभा यात्रा हनुमान मंदिरा पासुन बायपास रस्ता -संभाजी राजे चौक ढोकी नाका-छत्रपती शिवाजी महाराज चौक -होळकर चौक -बलाई कापड दुकान-सोनार गल्ली-डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी नगर मार्गे हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव भव्य अशी शोभा यात्रा काढण्यात आली.यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.या प्रसंगी हभप अर्जुन महाराज लाड गुरूजी यांचे सुश्राव्य किर्तन झाले.किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.शहरातील मृणाली सावंत हिने खुप छान रांगोळीतुन भगवान बाबांची प्रतिमा रेखाटली.पुण्यतिथी व किर्तन सोहळ्यासाठी एक हजाराहून अधिक लोक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!