August 9, 2025

ठाणे जिल्हयातील पत्रकारांसाठी “विकास पत्रकारिता” विषयावर कार्यशाळा

  • ठाणे (जिमाका) – माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्या अधिनस्त असलेल्या विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन व जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हयातील पत्रकारांसाठी मंगळवार, दि.९ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील टाऊन हॉल येथे ‘विकास पत्रकारिता’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
    मुद्रित (प्रिंट) आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील बदलते प्रवाह, विकास पत्रकारिता, पत्रकारांसाठी शासकीय सुविधा याबाबत पत्रकारांना माहिती व्हावी, या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस विनामूल्य प्रवेश असून कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी https://forms.gle/Ah2fL.PBSPXAQP1ic7 या लिंकवर क्लिक करुन तेथील प्राथमिक माहिती भरुन आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.
    तरी ठाणे जिल्हयातील पत्रकारांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि ठाणे महानगरपालिका उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी केले आहे.
error: Content is protected !!