लातूर – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण व्हावे अशी लातूरकरांची इच्छा गेल्या २० वर्षांपासून आहे असे निवेदन आंदोलन लातूरकरांनी कित्येक वेळा केले, भिम आर्मीच्या माध्यमातून ही वेळोवेळी आंदोलन करण्यात आले, गेल्या आंदोलनात तर भिम आर्मीने लातूर महानगरपालिकेला लॉक लावण्याचे काम केले होते तरी आद्याप सुशोभीकरण झाले नाही किंवा कामाला सुरवात झाली नाही. म्हणून दि.२१ डिसेंबर २०२३ रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आठ दिवसाच्या आता सुशोभीकरणाला सुरवात नाही झाल्यास भीम आर्मीच्या वतीने लातूर शहरांत महानगरपालिके च्या विरोधात वर्गणी जमा करा आंदोलन करु आणी जमा झालेला पैसा हा महानगरपालिकेला सुशोभीकारणासाठी देऊ, आसा इशारा मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे यांनी आयुकतांना दिला. यावेळी महाराष्ट्र संघटक अक्षयजी धावारे, जिल्हाप्रमुख विलास आण्णा चक्रे, जिल्हासचिव बबलू शिंदे, जिल्हासंघटक बबलू गवळे, जिल्हासंघटक सोनू घोडके, लातूर तालुका अध्यक्ष बप्पा घनगावकर, तालुका सचिव हरीश सोनवणे, लातूर शहर अध्यक्ष संदिप कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात भिम आर्मीचे पदाधीकारी उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले