August 9, 2025

वेद संकुलात ग्रामस्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन

  • कळंब (राजेंद्र बारगुले यांजकडून ) – ग्रामस्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छतेबरोबरच अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना कडाडून विरोध करून विज्ञानवादी दृष्टिकोन समाजाला दिला असे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांनी केले.
    कळंब शहरातील संभाजीनगर मधील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राणांगणात दि.२० डिसेंबर २०२३ रोजी संत गाडगेबाबा महाराज यांच्या ६७ व्या स्मृतिदिनानिमित्त भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी प्रशिक्षणार्थींना संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत असताना प्रा.पवार हे बोलत होते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले.
    यावेळी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक सागर पालके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!