कळंब (महेश फाटक ) – बस स्थानक कळंब येथील श्री दत्त मंदिर येथे प्रति वर्षाप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव दिनांक २० डिसेंबर २०२३ बुधवार ते २७ डिसेंबर २०२३ बुधवार या कालावधीत साजरा करण्यात येत असून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ संपन्न होत असून ह .भ .प .वे.शा.सं. पंडित गणेश महाराज शिंगाडे सेलुकर हे आपल्या अमृतवाणीतून दुपारी २.३० ते ५. ३० वेळेत भागवत कथा कथन करतील त्यांना तबला साथ ह .भ .प .स्वप्नील कातमांडे व हार्मोनियम साथ शिवदास काका पिंगळे हे करणार आहेत या निमित्त काकडा आरती, विष्णुसहस्रनाम पाठ सेवा, गुरुचरित्र पारायण ,श्रीमद् भागवत संहिता पाठ वाचन, श्रीस नैवेद्य याच बरोबर उत्सवात दररोज सकाळी११.०० ते २.०० या वेळेत विविध महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा होणार आहे दिनांक २६ डिसेंबर सकाळी ६.०० ते ८.०० प्रति वर्षाप्रमाणे श्रीदत्त भक्तांच्या वतीने श्रीची महापूजा होणार असून दुपारी ४.०० ते ६.०० या वेळेत ह .भ. प. श्री शाहू महाराज भारती आंदोरा यांचे श्री दत्त जन्मोत्सवाचे सुश्राव्य किर्तनने श्री दत्त जन्मोत्सव साजरा होणार आहे तर दिनांक २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० ते १२.०० ह. भ. प. बळीराम महाराज कवडे यांचे काल्याचे किर्तन होईल व नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे वरील दोन्ही कीर्तनात महिला भजनी मंडळ मृदंग साथ ह. भ .प .कृष्णा महाराज कदम हे करतील श्री दत्त जयंती उत्सव सप्ताहाची सुरुवात दिनांक २० डिसेंबर रोजी मान्यवरांच्या साहित्य हस्ते पूजन करून करण्यात आली दीपपूजन बालाजी भारती साहेब अा. प्र. रा.प. कळंब कलश पूजन पुजारी संतोष जोशी मंडपूजन उपप्राचार्य सतीश लोमटे ,ध्वज पूजन बालाजी मुळे , विना पूजन ह. भ. प .महादेव महाराज अडसूळ ,विपिन कटारे ,औदुंबर पूजा अनंत कवडे, हंडी पूजा करसन पटेल, ग्रंथ पूजन अभिजीत धाकतोडे ,झोळीपूजन, शिवाजी कदम ह भ प बळीराम महाराज कवडे, माधवसिंग राजपूत, अजय कदम यांच्या हस्ते तर नामस्मरणारंभ मनोहर बप्पा चोंदे यांच्या हस्ते झाला या दत्त जयंती उत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्तभक्त श्री दत्त मंदिर बस स्थानक कळंब यांच्या वतीने करण्यात आले आहे.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर