परंडा – श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील बी.ए.द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु.अश्विनी परमेश्वर गोडगे हिने नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत तिची ठाणे शहर पोलीसपदी निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्या हस्ते अश्विनी गोडगे हिला बुके देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे,अश्विनी गोडगे हिचे वडील परमेश्वर गोडगे, डॉ.अमर गोरेपाटील,प्रा.संभाजी धनवे,प्रा.दीपक हुके,प्रा.अंकुश शंकर,प्रा.बी.डी.माने,प्रा.रणजीत वरपे आदी उपस्थित होते. अश्विनी गोडगे हिच्या या यशाबद्दल सर्व मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.
More Stories
परंड्यात संयुक्त जयंती उत्सव समितीची घोषणा
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश