आष्टा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेस तसेच संस्थाध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.हे पूजन गावातील आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद्र (भाऊ) वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रभावी व अभ्यासपूर्ण भाषणे सादर केली. कार्यक्रमात बोलताना रविंद्र (भाऊ) वाघमारे म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धे नव्हते,तर ते लोककल्याणकारी,दूरदृष्टी असलेले आदर्श शासक होते. विद्यार्थ्यांनी त्यांचा शौर्य, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची वाटचाल करावी. शिक्षणासोबतच स्वाभिमान आणि समाजनिष्ठा जपली तरच खऱ्या अर्थाने शिवरायांना अभिवादन होईल.” मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,”शिवाजी महाराजांचे शौर्य, सचोटी आणि नेतृत्वगुण विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेणारे आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक शशिकांत मांजरे यांनी केले.प्रास्ताविक नामदेव अनंत्रे यांनी मांडले,तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका श्रीम.निर्मला वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा संघपाल सोनकांबळे यांनी आखली. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.अशा प्रकारे प्रशालेत शिवजयंती उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली.
More Stories
विद्यार्थीप्रिय गणित विषयाचे शिक्षक शशिकांत मांजरे यांचा वाढदिवस जल्लोषात
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली स्वयंशासन दिन उत्साहात
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन