September 21, 2026

“शिवजयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा” – प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी

  • मोहेकर महाविद्यालयात शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती उत्साहात
  • कळंब – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
    सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “शिवजयंती नाचून नाही तर शिवचरित्र वाचून साजरी करा”असे आवाहन केले.
    प्रा.डॉ.सूर्यवंशी म्हणाले,“स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्य यांचे प्रतीक असलेले शिवाजी महाराजांचे तेजस्वी व्यक्तिमत्त्व आजही मार्गदर्शक आहे. धर्मनिरपेक्षता,न्याय आणि सुशासन यांची शिकवण त्यांनी कृतीतून दिली.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत धैर्य,दूरदृष्टी आणि संघटनशक्तीच्या बळावर त्यांनी स्वराज्य उभे केले.त्यांच्या पराक्रम,किल्ले आणि प्रशासन व्यवस्थेतून आजच्या तरुणांनी स्वाभिमान,शिस्त,राष्ट्रनिष्ठा, समता आणि कर्तव्यनिष्ठा या मूल्यांचा वारसा जोपासला पाहिजे.”
    ते पुढे म्हणाले,“आज विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे.सकारात्मक विचार आणि ध्येय निश्चिती यांमधून वाटचाल करणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजांनी समताधिष्ठित स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. अठरापगड जाती-जमातींना मुख्य प्रवाहात आणून माणूस म्हणून जगण्याची संधी दिली.म्हणूनच त्यांचे कार्य ‘भूतो न भविष्यती’ असे प्रेरणादायी आहे.”
    कार्यक्रमाचे आयोजन ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
    व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. संजय कांबळे, उपप्राचार्य सा.साक्षी पावन ज्योतचे उपसंपादक डॉ.के.डी. जाधव तसेच उपस्थित होते.
    यावेळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सामूहिक पूजन करण्यात आले व उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
    कार्यक्रमास प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    संतोष मोरे,मारुती केचे, कमलाकर बंडगर आणि चांगदेव खंदारे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!