आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल येथे दि.२५ जानेवारी २०२६ वार रविवार रोजी संस्थामाता कै.सुमन आई ज्ञानदेव मोहेकर यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी सहशिक्षक नामदेव अनंत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव, बबन यादव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यामंदिर हायस्कूल आष्टात कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्मृतीस अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन देशभक्तीच्या वातावरणात उत्साहात साजरा