February 8, 2026

रमेश (भाऊ) मोहेकर यांचा साक्षी पावनज्योतच्या वतीने गौरव

  • मोहा – मराठवाड्यात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाच्या माध्यमातून विविध ठिकाणी शाळा,विद्यालये व महाविद्यालयांच्या रूपाने दर्जेदार शिक्षणाची चळवळ उभी राहिली आहे.या कार्यामागे संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
    या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांनी संस्थेच्या प्रशासकीय कामकाजात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दि.१२ जानेवारी २०२६,सोमवार रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योतचा विशेष अंक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
    या प्रसंगी सा.साक्षी पावनज्योतचे कार्यकारी संपादक अविनाश घोडके उपस्थित होते.
error: Content is protected !!