February 8, 2026

विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे भावपूर्ण पूजन

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि.८ जानेवारी २०२६ रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले.
    या कार्यक्रमात गुरुजींच्या शैक्षणिक व समाजोपयोगी कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
    उपस्थितांनी ज्ञान,संस्कार व सेवाभाव या मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
error: Content is protected !!