वाशी – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा यांचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका व सामाजिक परिवर्तनाची धुरा सांभाळणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घडविलेल्या कार्यामुळे स्त्री शिक्षणाला दिशा मिळाली,याची उजळणी या प्रसंगी करण्यात आली.स्त्री शिक्षण,सामाजिक सुधारणा आंदोलन आणि काळाच्या पुढचा विचार करणारे त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक एस.पी.जगताप यांनी केले,तर सहशिक्षक एस.के.बोडके यांनी मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला. या प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी,शिक्षक संतोष ढोले, संतोष बोडके,सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास जगताप,शिक्षकेत्तर कर्मचारी पत्रकार शिवराम शिंदे, लहू फुरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यार्थ्यांची तहान भागवली! शिवम बोअरवेल कन्हेरवाडीची निस्वार्थ सेवा; बंद बोअरवेल मोफत दुरुस्त
संभाजी विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी