May 14, 2026

“शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमापूजनाने नववर्षाचा शुभारंभ”

  • आष्टा — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१ जानेवारी २०२६ वार गुरुवार रोजी विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे संस्थापक अध्यक्ष कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    या प्रसंगी प्रतिमा पूजनाचा मान प्रशालेचे ज्येष्ठ गणित शिक्षक शशिकांत मांजरे यांना लाभला. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थित होती.
    शिक्षण क्षेत्रातील मोहेकर गुरुजींच्या बहुमोल कार्याचे स्मरण करत त्यांच्या आदर्शातून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!