March 25, 2026

“स्वप्नातील घर” साकारले : पिंपळगाव (डोळा) येथे सदघर योजनेअंतर्गत सुभाष घोडके यांच्या घराचा भव्य शुभारंभ

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले) – समता सामाजिक विकास संस्था व एच.आर.डी.एस.यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “स्वप्नातील घर (सदघर योजना)”अंतर्गत भीम नगर,पिंपळगाव (डोळा),ता.कळंब,जि.धाराशिव येथील लाभार्थी सुभाष दशरथ घोडके यांच्या घराचा शुभारंभ उत्साहात पार पडला.
    या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रभा मार्डीकर,मराठवाडा प्रोजेक्ट मॅनेजर गोरे,काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष भागवतराव धस यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा सुपरवायझर एन. एम.घुटुकडे व सौ.शिवगंगा धुमाळ होते.
    या प्रसंगी सदघर योजनेतील लाभधारकांना घराचे मार्क आउट देण्यात आले.संस्थेच्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित व सन्मानाने निवास मिळण्याचा मार्ग मोकळा होत असून “स्वप्नातील घर” प्रत्यक्षात उतरविण्याचा संस्थेचा संकल्प अधोरेखित झाला.
    या कार्यक्रमास बीड जिल्हा सुपरवायझर बालाजी मुळे, आम्रपाली गजेशू,लातूर जिल्हा सुपरवायझर कोकणे,आशा ढगे,झुंबर पिंपळकर,माजी सदस्य देविदास घोडके,मुख्याध्यापक बळीराम घोडके,लिंबराज घोडके, ग्रामपंचायत सदस्य श्रीरंग घोडके,शाहूराज कळसे,रोजगार सेवक सौदागर जगताप,मधुकर टेकाळे यांची उपस्थिती होती.
    उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजातील दुर्बल घटकांना मोठा आधार मिळतो,असे मत व्यक्त केले.
    कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी,कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!