February 8, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.26 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 249 कारवाया करुन 1,97,950 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • ढोकी पोलीस ठाणे:आरोपी नामे-लताबाई विठ्ठल काळे, वय 45 वर्षे, रा. जयभवानीनगर पारधी पिडी ढोकी ता. जि. धाराशिव या दि.26.12.2025 रोजी 17.15 वा. सु. तेरणा कारखाण्याचे बाजूला अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-फुलाबाई सर्जेराव काळे, वय 60 वर्षे, रा. जयभवानीनगर पारधीपीढी ढोकी ता. जि. धाराशिव या दि.26.12.2025 रोजी 17.45 वा. सु. तेरणा कारखाण्याचे उत्तर बाजूस अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • वाशी पोलीस ठाणे:आरोपी नामे-अतुल महादेव कोकाटे, वय 31 वर्षे, रा. निपाणी ता. भुम जि. धाराशिव हे दि.26.12.2025 रोजी 18.45 वा. सु. हॉटेल शिवराज चे पाठीमागे राहत्या घरासमोर अंदाजे 1,120 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-आकाबाई उर्फ दैवशाला हनुमंत सोनवणे, वय 57 वर्षे, रा.बरमाचीवाडी ता. कळंब जि. धाराशिव या दि.26.12.2025 रोजी 16.30 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,800 ₹ किंमतीची 27 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-राम हाणुमंत सुतार, वय 35 वर्षे, रा.बाळेगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.26.12.2025 रोजी 12.20 वा. सु. आपल्या राहत्या शेडच्या बाजूला अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हे नोंदविला आहे
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.26.12.2025 रोजी 12.30 वा. सु. आनंदनगर पो ठाणे हद्दीत नगरपालीकेचे समोरील रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सय्यद सादीक मोरामोईद्दीन, वय 51 वर्षे, रा. सांजा वेस गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 12.30 वा. सु. नगरपालीकेचे समोरील रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्या एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आनंदनगर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.26.12.2025 रोजी 15.10 वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत मोहा येथे दर्गाच्या पाठीमागील बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-रोहिणी सुनिल शिंदे, वय 21 वर्षे, रा. गोलेगाव ता. भुम जि. धाराशिव ह.मु. मोहा ता. कळंब जि. धाराशिव हे 15.10 वा. सु. मोहा येथे दर्गाच्या पाठीमागील बाजूस सुरट मटका जुगाराचे साहित्या एकुण 1,215 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-12 (अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- जितेंद्र सुरेश पाटील, रवींद्र सुरेश पाटील, सुधाकर नरसिंग बिराजदार, ज्योती जितेंद्र पाटील, सुनिता पाटील सर्व रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.25.12.2025 रोजी 13.30 वा. सु. शेत गट नं 124 मध्ये वागदरी शिवार येथे फिर्यादी नामे-पदिमनी निवृत्ती बिराजदार, वय 40 वर्षे, रा. वागदरी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन मिरची डोळ्यात टाकून जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पदिमनी बिराजदार यांनी दि.26.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे नळदुर्ग येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 352, 351 (3), 189, 189(4), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “नुकसान करणे.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :दि.21.12.2025 रोजी 00.30 वा. सु. सिंदफळ गावातील ग्रामपंचायत शेजारी सरकारी घंटागाडी क्र एमएच 25 एजे 5344 हीस अज्ञात व्यक्तीने आग लावून जाळून साठ हजार रुपयाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मनोज उत्तम चौगुले, वय 43 वर्षे, व्य-ग्रामपंचायत अधिकारी सिदंफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.26.12.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे तुळजापूर येथे भा.न्या.सं.कलम 326(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे :मयत नामे- आकाश विद्यासागर भुरे, वय 25 वर्षे, रा. केसरजवळगा ता. उमरगा हे दि.14.12.2025 रोजी 20.30 ते 20.40 वा. सु.बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 बीई 2630 वरुन जात होते. दरम्यान चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर पेपर मिल जवळ ट्रॅक्टर क्र एमएच25 बीएफ चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे रोडवर कसल्याही प्रकारचे इंडिकेटर व दिशा फलक न लावता रोडवर उभा केल्याने आकाश भुरे यांची मोटरसायकल ट्रॅक्टरला समोरुन धडकून गंभीर जखमी होवून मयत झाले. तर जखमी नामे- चंद्रकांत आण्णाप्पा चिंचोले, रा. आळंगा यांची मोटरसायकल क्र एमएच 12 बीटी 4694 ही ट्रॅक्टरला पाठीमागून धडकून गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रेवाप्पा विद्यासागर भुरे यांनी दि.26.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 285,281, 125 (ए), 125(बी), 106 (1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे :मयत नामे-शरद नरसिंग धिरे, वय 40 वर्षे, रा. लाडेगाव ता.केज जि. धाराशिव हे दि.21.12.2025 रोजी 16.00 वा. सु.मोटरसायकल क्र एमएच 44 एच 1844 वरुन जात होते. दरम्यान अशोक लिलॅड टॅकर क्र एमएच 42 एक्यु 1042 चा चालकाने त्याचे ताब्यातील लिलॅड टॅकर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून शरद धिरे यांचे मोटरसायकलाल धडक दिली. या अपघातात शरद धिरे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अनिता शरद धिरे, वय 37 वर्षे, रा. लाडेगाव ता. केज जि. बीड यांनी दि.26.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125 (ए), 125(बी), 106(1) सह 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “लैंगीक अत्याचार.”
  • परंडा पोलीस ठाणे :एका गावातील 20 वर्ष मुलगी (नाव- गावगोपनीय) दि.19.12.2025 रोजी 09.30 वा. सु. हिस गावातील एका तरुणाने दवाखान्यात बोलावून घेवून तिस फुल लावून किंवा लग्नाचे आमीष दाखवून व लैंगीक अत्याचारासाठी कोठेतरी डांबुन ठेवले आहे. अशा मजकुराच्या पिडीतेची आई यांनी दि.26.12.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-137, 138, 87, 128, 64,351 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!