March 26, 2026

विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा — डॉ.शहाजी चंदनशिवे

  • रा.गे.शिंदे महाविद्यालयात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा
  • परंडा – रा.गे.शिंदे महाविद्यालयात विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना डॉ.शहाजी चंदनशिवे म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी जीवन अत्यंत संघर्षमय होते.त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या ज्ञानाच्या बळावर या देशाची घटना घडवली. विद्यार्थी कसा असावा, तर तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा संघर्ष करूनही शिक्षणाची कास न सोडणारा. आज कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा उभा आहे,हे शिक्षणाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे.
    त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की,शिक्षण हाच खरा विकासाचा पाया आहे.डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून जीवनात प्रगती साधा.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव होते.शासनाच्या परिपत्रकानुसार हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या वेळी उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने,प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने,प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अतुल हुंबे,डॉ. संतोष काळे,प्रा.केशव शेटे, प्रा. प्रकाश मिसाळ,बबन ब्रह्मराक्षस, जयवंत देशमुख यांच्यासह संशोधन विद्यार्थी उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अतुल हुंबे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
    संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.
error: Content is protected !!