कळंब – धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त,विधवा,परितक्ता व एकल अशा ५०० महिला शेतकऱ्यांना पुण्यधाम ट्रस्ट संचलित पुण्यधाम आश्रम,पुणे यांच्या वतीने रब्बी हंगामासाठी हरभरा बियाण्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम दि.६ नोव्हेंबर रोजी हसेगाव (के) येथे पर्याय सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे आयोजन माता कृष्ण कश्यप व पर्याय सामाजिक संस्थेचे कार्यवाहक विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पुण्यधाम ट्रस्टचे ट्रस्टी गणेश कामठे म्हणाले,शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो कोणापुढे हात पसरणारा नाही.आज संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचा हा प्रयत्न आहे.पुण्यधाम ट्रस्ट पुढेही अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर राहील. कार्यक्रमास शाम मरळ,सूर्यकांत कामठे,निलेश काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षीय भाषण विश्वनाथ (अण्णा) तोडकर यांनी केले. या प्रसंगी बाळासाहेब धस, विलास गोडगे,सुनंदा खराटे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ऋषिकेश तोडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिताताई तोडकर,भिकाजी जाधव,बालाजी शेंडगे,परमेश्वर गवारे,विकास कुदळे,प्रमिला राख, आनंद जाधव,कल्पना जतकर, अश्विनी काकडे,निकिता चंदनशिवे,शकुंतला गोडगे,जयश्री कोठावळे,रियाज शेख,अशोक शिंदे,अजहर तुटके,दिगंबर लडके यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी