February 9, 2026

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची दमदार सुरूवात

  • नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहिला!
  • धाराशिव – धाराशिव नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) ची पहिलीच बैठक दि.७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वेदबाग निवासस्थानी’ नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्साहाच्या वातावरणात पार पडली. जिल्हाध्यक्षपदाच्या बदलानंतर झालेल्या या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, नवचैतन्य आणि पक्षाच्या भविष्यासाठी आशावादाचे वातावरण निर्माण झाले.
    बैठकीत सर्वांनी एकमुखाने महाविकास आघाडी करूनच आगामी निवडणुका लढवाव्यात, असा ठराव मांडत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.शहरातील सर्व प्रभागांचा आढावा घेण्यात आला असून,खलिफा कुरेशी यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी द्यावी,असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.जवळपास ६० इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी आपली मागणी जिल्हा नेतृत्वासमोर मांडली.
    कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान आपली स्पष्ट मते मांडत,पक्ष नेतृत्वाने तळागाळातील कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे,अशी अपेक्षा व्यक्त केली.
    या वेळी शेखर घोडके,इस्माईल शेख,रवि ठेंगल,ॲड.योगेश सोन्ने-पाटील यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
    ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे यांनी आवाहन केले की,आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज व्हा,पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील म्हणाले,कार्यकर्ता सक्षम झाला तरच पक्ष सक्षम होईल.प्रत्येकाला पक्षाच्या गरजेनुसार जबाबदारी दिली जाईल.ज्या ठिकाणी आपला उमेदवार जिंकू शकतो,त्या ठिकाणी महाविकास आघाडीतून आपली जागा राखण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
    बैठकीचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष आयाज शेख यांनी केले.सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करू, धाराशिवमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा उंच फडकवू असा निर्धार व्यक्त केला.

  • या बैठकीला डॉ.प्रतापसिंह पाटील,जीवनराव गोरे,मसूद शेख, श्याम घोगरे,आयाज शेख,कादर खान पठाण,खलिफा कुरेशी, शेखर घोडके,डॉ.अविनाश तांबारे, बाबा मुजावर,इस्माईल शेख, जयंत देशमुख,रणवीर इंगळे, ज्योती माळाळे,अमोल सुरवसे, आदित्य पाटील,रोहित बागल, पंकज भोसले,ॲड.योगेश सोन्ने-पाटील,दत्ता पवार,रवि ठेंगल,अविनाश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या बैठकीतून धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे.
error: Content is protected !!