पुणे – श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या पुणे जिल्हा संघटकपदी पुण्यातील उत्साही युवा कार्यकर्ते संकेत संजय शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सल्लागार ॲड. सागर शिंदे यांच्या हस्ते वानवडी येथील ऐतिहासिक महादजी शिंदे छत्री येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुहास शिंदे, सचिव दीपक शिंदे, ज्येष्ठ पदाधिकारी संजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संकेत शिंदे यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
More Stories
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर