खामसवाडी – खामसवाडी येथील भीमनगर परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक आणि प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला.ही मूर्ती भिमप्रेमी प्रतिष्ठान,सोलापूर यांच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात आली. या मिरवणुकीत बौद्ध अनुयायी, युवक,महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावभर “जय भीम” आणि “बुद्धं शरणं गच्छामि” या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. कार्यक्रमास माणिक काकडे, चंद्रसेन सावंत,उत्तम सावंत तसेच भिम आर्मी तालुका अध्यक्ष अमोल सोनटक्के उपस्थित होते. या वेळी राहुल सावंत (सर) आणि रतन सावंत यांनी बौद्ध धम्म, समता आणि बंधुता यावर मार्गदर्शन करून उपस्थितांना प्रेरणा दिली. भिमप्रेमी प्रतिष्ठान सोलापूरच्या या सामाजिक व बौद्धिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले असून, खामसवाडी परिसरात समतेचा आणि प्रबोधनाचा संदेश या प्रतिष्ठापनेतून दिला गेला.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड