माजी विद्यार्थी सुदर्शन जाधव यांच्या पुढाकारातून सदिच्छा भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न
मुरूड – कृषी विद्यालय नायगावचे माजी विद्यार्थी आणि सध्या एस.टी.महामंडळ,धाराशिव येथे कार्यरत असलेले सुदर्शन जाधव यांच्या प्रयत्नातून माजी विद्यार्थ्यांचा सदिच्छा भेट व स्नेहमेळावा कार्यक्रम मुरूड येथे दि.२५ ऑक्टोबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.या प्रसंगी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योत दीपावली विशेषांक–२०२५ चे वितरण कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकात ग्रामीण कथा, कविता,चालू घडामोडींवरील लेख, तसेच समाज,शिक्षण,कृषी आणि प्रशासन क्षेत्रातील महत्वाच्या बातम्या व माहितीचा समावेश आहे.
कृषी विद्यालय नायगावचे माजी विद्यार्थी १८ वर्षांनी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विविध क्षेत्रात अधिकारी,व्यापारी, कृषी व्यावसायिक म्हणून काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी या भेटीचा आनंद लुटला. या वेळी शिक्षक व सध्या वर्धा कृषी कार्यालयात कार्यरत हनुमंत अंकुश यांनी उपस्थितांना सकस आहार,नियमित व्यायाम आणि चांगल्या आरोग्याच्या सवयी याबाबत मार्गदर्शन केले. तर बीड कृषी कार्यालयातील जिल्हा समन्वयक जयशिव जगधने यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सातारा येथील ग्रामविकास अधिकारी तुकाराम जाधवर,धुळे येथील व्यापारी अख्तर फारोखी,कृषी व्यावसायिक स्वप्निल राऊत, डी.डी.एन.कारखाना वाटवठा येथील सुशांत ससाणे,निर्मिती अॅग्रो टेक्नॉलॉजीचे दत्ताजी लोमटे, तसेच लातूर येथील ग्रामविकास अधिकारी गजानन ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो