February 8, 2026

शेतकऱ्यांच्या विविध अडचणी तात्काळ सोडवाव्यात — राष्ट्रवादी किसान सभेचे कृषि मंत्र्यांना निवेदन

  • धाराशिव – शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी, अडथळे आणि योजनांमधील अंमलबजावणीतील विलंब यावर तातडीने उपाययोजना कराव्यात,या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा,धाराशिव जिल्हा तर्फे जिल्हाध्यक्ष सतीश राजाभाऊ घोडेराव (मा.सभापती,पंचायत समिती,धाराशिव) यांनी संपर्क मंत्री तथा राज्याचे कृषि मंत्री दत्तात्रयजी मामा भरणे यांना सविस्तर निवेदन सादर केले.
    या निवेदनात शासनाच्या कृषी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांचा अडथळामुक्त प्रवास आणि बँकिंग प्रणालीतील त्रुटी दुरुस्त करण्याच्या महत्त्वपूर्ण मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
    National Livestock Mission (NLM) योजनेअंतर्गत शेळीपालन,कुक्कुटपालन आणि म्हैसपालन या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असले तरी पोर्टलवरील सबमिट पर्याय लॉक असल्यामुळे अर्ज अंतिम टप्प्यापर्यंत जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पोर्टल तात्काळ अनलॉक करून अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करावी,अशी मागणी करण्यात आली आहे,महा डी.बी.टी. पोर्टलवर वेळेअभावी कागदपत्रे अपलोड न झाल्याने अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.अशा लाभार्थ्यांना ३० दिवसांची अतिरिक्त मुदत देऊन अर्ज मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.तसेच सामुदायिक ७/१२ उताऱ्यावर नोंद असलेल्या सर्व खातेदारांना स्वतंत्र Farmer ID देण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी,ज्यामुळे विमा संरक्षण व योजना लाभ दोन्ही मिळतील,असेही या निवेदनात नमूद आहे,सिबिल खराब आहे किंवा जामिनदार नाही या कारणांवरून बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. मात्र,शेती गहाणखत ठेवून कर्ज घेतले जात असल्याने अशा अटी वगळून शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा करण्याचे निर्देश द्यावेत,अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानभरपाई तात्काळ देण्यात यावी,अन्यथा आत्महत्यांचे प्रमाण वाढेल,असा इशारा किसान सभेने दिला आहे,महा डी.बी.टी.योजनेंतर्गत एका तालुक्यात एकच अर्ज मंजूर होतो,ही मर्यादा रद्द करून किमान पाच अर्ज मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे,ज्यामुळे आधुनिक शेतीसाठी आवश्यक अवजारे,नांगर,ऊसकापणी यंत्र इत्यादी शेतकऱ्यांना उपलब्ध होतील.तसेच कुसुम योजना अंतर्गत सहा महिन्यांपूर्वी डिपॉझिट भरूनही सौर कृषी पंप न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंप देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
    यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव म्हणाले की,शासनाच्या कृषी योजनांचा हेतू चांगला असला तरी तांत्रिक व प्रशासकीय अडथळ्यांमुळे शेतकरी त्रस्त आहेत. हे अडथळे दूर करून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण तातडीने करण्यात आले नाही, तर किसान सभा आंदोलनाचा मार्ग अवलंबेल.
    हे निवेदन दत्तात्रयजी मामा भरणे, कृषि मंत्री,महाराष्ट्र राज्य यांना सादर करण्यात आले असून, आगामी काळात या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक घेण्याची अपेक्षा किसान सभेने व्यक्त केली आहे.
error: Content is protected !!