धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 157 कारवाया करुन 97,700 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)राज प्रदीप झेंडे, वय 25 वर्षे, रा. बौध्दनगर, धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.28.11.2023 रोजी 17.25 वा. सु. रजनिकांत कल्याण माळाळे यांचे पत्रयाचे शेड समोर मोकळ्या जागेत अंदाजे 800 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)मुस्सा महेबुब मिरगाळे, वय 46 वर्षे, रा. तुरोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.11.2023 रोजी 12.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ऑटो रिक्षा क्र एमएच 25 एन 793 हा एन एच 65 सोलापूर हैद्राबाद हायवे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अनिल लगाडे, वय 23 वर्षे, रा.दसमेगाव, ता. वाशी जि. धाराशिव हे दि.28.11.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल ही दसमेगाव ते दळवेवाडी जाणारे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)फकिर महेबुब घुडूशा, वय 24वर्षे, रा. रहिमनगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव 2) किसन शंकरलाल चौधरी, वय 29 वर्षे, रा. जगतापनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दोघे दि.28.11.2023 रोजी 19.20 ते 19.40 वा. सु वेगवेगळ्या दोन ठिकाणी रस्त्यालगत आपल्या गाड्यावर वाहानास अडथळा निर्माण करुन आईस्क्रीम विक्री करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)लोकेश शिवाजी चव्हाण, वय 32 वर्षे, रा. रुईभर, ता. जि. धाराशिव हे दि.28.11.2023 रोजी 12.45 वा. सु बेंबळी ते धाराशिव जाणारे रोडवर रुईभर पाटीजवळ रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
भुम पोलीस ठाणे : आरोपी नामे- मिनीनाथ नरके, रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 28.11.2023 रोजी 07.25 वा. सु. चिंचोली बसस्थानक व भुम बसस्थानक येथे फिर्यादी नामे- विजय पांडुरंग बनसोडे, वय 54 वर्षे, व्यवसाय- बस चालक बॅच नं 40197 भुम आगार रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हा बस आडवून फिर्यादीस म्हणाला की “तु सुकटा येथील एक पॅसेंजर एस. टी. मध्ये का घेतला नाही”असे म्हणून शिवीगाळ करुन काठीने लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी देवून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजय बनसोडे यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 353, 341, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- अनिरुध्द नागनाथ पंडीत, वय 42 वर्षे, रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी अंदाजे 19,35,238 ₹ किंमतीचे 22 कॅरेटचे 342 ग्रॅम 520 मिली वजनाचे सोने हे डायी, बॉल, चेक्स, पट्टे, जाळी, सोन्याची तार बणवण्यासाठी दिलेले असताना नमुद आरोपी नामे-राजु रंगनाथ सामंत, वय 34 वर्षे, रा. ग्राम पोतापूर ता. घाटाल जि. पश्चिम मंदीरपुर राज्य पश्चिम बंगाल यांनी दि.24.11.2023 ते दि. 26.11.2023 रोजी 08.24 वा. सु. दहिफळ येथील श्री ज्वेलर्स दुकानाचे बाजूच गाळ्यामधून अनिरुध्द पंडीत यांना न विचारता घेवून जावून फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिरुध्द पंडीत यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
मुरुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विकास भैरु गायकवाड, वय 48 वर्षे, रा. आरोग्य नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे समृध्दी इंग्लिश मेडियम स्कुलच्या खोलीचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 27.10.2023 रोजी 06.00 ते दि. 28.11.2023 रोजी 09.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन एक कॅनॉन कंपनीचे प्रिंटर, एक कॉम्प्युटर मॉनिटर, एक ॲम्पलीफायर, एक माईक, थ्री फेज इलेक्ट्रीक वायर,टु फेज इलेक्ट्रीक वायर 250 फुट, एक ब्ल्लुटुथ साउंड असा एकुण 20,300 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास गायकवाड यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 461, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला.
रस्ता अपघात.” आनंदनगर पोलीस ठाणे : मयत नामे- मच्छिंद्र गोरोबा वाघमारे, वय 60 वर्षे, रा. रमाईनगर, धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.19.11.2023 रोजी सायंकाळी 06.45 वा. सु. गपाट दवाखान्याचे समोर सेंन्ट्रल बिल्डींग ते बसस्थानक जाणारे रोडवर धाराशिव येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून मच्छिंद्र वाघमारे यांना जोराची धडक दिली. या आपघातात मच्छिंद्र वाघमारे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुमन मच्छिंद्र वाघमारे, वय 55 वर्षे, यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304 (अ), सह मोवाका कलम 134, 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला