August 8, 2025

प्रा.अनिल जगताप यांना पीएचडी पदवी प्रदान

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब येथील प्रा.अनिल जगताप याना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी दि.09 नोव्हंबर 2023 रोजी प्रदान करण्यात आली. प्रा.जगताप यानी ‘Indian Socio-political and Cultural Realities in the Selected Novels of Tabish Khair’ या विषयावर शोध प्रबंध सादर केला होता. डॉ.प्रशांत मोटे (आदर्श कॉलेज उमरगा जि.धाराशिव) यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जगताप यानी शोध प्रबंध पूर्ण केला.डॉक्टरेट हि पदवी संपादित केल्याबदल संस्थेच्या वतीने शिवाजी कापसे (सचिव-शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) शाम खबाले (अध्यक्ष-शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कळंब) उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे सर,सहसचिव संजय घुले, कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे,भागवत चोंदे,सौ. नरहरी मॅडम,श्री.सोनटक्के साहेब व प्राचार्य,शशिकांत जाधवर या मान्यवरांच्या हस्ते डॉ.अनिल जगताप यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यानी डॉ.अनिल जगताप याना या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!