August 8, 2025

आंबा लागवड व निर्यात वाढीसाठी 30 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा

  • धाराशिव (जिमाका):- जिल्हयामध्ये आंबा फळपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तसेच आंबा मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर आधुनिक अतिघन आंबा लागवड जिल्हास्तरीय कार्यशाळा धाराशिव तालुक्यातील वाघोली येथील लक्ष्मी कृषी फार्म येथे 30 नोव्हेंबर रोजी ( राजेंद्र मगर आंबा उत्पादक शेतकरी यांचे शेतावर ) सकाळी 9.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
    या कार्याशाळेत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी.पाटील, तज्ञ संचालक महाकेसर आंबा बागायतदार संघाचे डॉ.भगवानराव कापसे आणि रेन्बो इंटरनॅशनलचे संचालक अभिजित भसाले आंबा निर्यातदार हे मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे उद्धाटन अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे तसेच लातूरचे विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या हस्ते होणार आहे.
    जिल्हयातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मँगोनेट प्रणालीवर नोंदणी करुन जास्तीत जास्त आंबा निर्यात होण्यास वाव मिळेल याकरीता कार्यशाळेच्या ठिकाणी नोंदणी करुन घेण्यात येणार आहे. आंबा उत्पादन /लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी या कार्यशाळेस उपस्थित राहतेवेळी मँगोनेट प्रणलीवर नोंदणीकरीता विहित फॉर्ममध्ये (नोंदणीकरीता 7/12,8अ,मतदान कार्ड,आधारकार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.) माहिती जमा करुन घेतली जाणार आहे.
    या आंबा लागवड जिल्हास्तरीय कार्यशाळेस जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
error: Content is protected !!