धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा.डॉ.गोविंद काळे व लक्ष्मण सोपान हाके हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरीता धाराशिव जिल्ह्यातील विविध जातींच्या संदर्भात क्षेत्र पाहणीकरीता येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 4 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता लातूरहून शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे आगमन व मुक्काम. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता उमरगा तालुक्यात उमरगा शहर व चिंचकोट येथे क्षेत्र पाहणी. सकाळी 11 वाजता लोहारा तालुक्यात फणेपूर व बेलवाडी येथे दौरा. दुपारी 12 वाजता तुळजापूर तालुक्यातील किलज व होर्टी येथे क्षेत्र पाहणी दौरा. दुपारी 1 वाजता तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 1.30 वाजता श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन. दुपारी 2 वाजता भोजन. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी व धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाच्या इतर मागास वर्ग बिंदूनामावली व जिल्हा बदलीबाबत, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या अधिपत्याखालील वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची इमाव/विजाभज/विमाप्र प्रवर्गासाठी मंजूर पदे/कार्यरत पदे/रिक्त पदे याबाबतचा आढावा, भटक्या विमुक्त संवर्गासाठीच्या योजनांचा आढावा तसेच मागील तीन वर्षाचा जातनिहाय प्रमाणपत्र निर्गमनाचा आढावा. दुपारी 4.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मागासवर्ग कक्षाचे सहाय्यक आयुक्त यांच्यासोबत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचाऱ्यांची मंजूर पदे/कार्यरत पदे/रिक्त पदे याबाबतचा आढावा तसेच बिंदुनामावली बाबत आढावा. सायंकाळी 7 वाजता तुळजापूरहून सोलापूरकडे प्रयाण.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला