March 26, 2026

लाखीतील गायकवाड कुटुंबाला दिलासा;डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी घेतली विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी

  • परंडा – परंडा तालुक्यातील लाखी गावातील ओम गायकवाड या विद्यार्थ्याचे घर नुकत्याच झालेल्या पूरामुळे कोसळले असून कुटुंब उघड्यावर आले आहे. संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे शिक्षणासारखी मूलभूत स्वप्ने धोक्यात आली होती.
    या कठीण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) प्रदेश सरचिटणीस डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील मदतीला धावून आले.त्यांनी पूरग्रस्त गायकवाड कुटुंबाला आवश्यक साहित्य घरपोच करून दिले तसेच ओम गायकवाडच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली.
    ओमच्या दहावीनंतरच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेताना डॉ.पाटील म्हणाले,“हा विद्यार्थी पुढे शिकून मोठा व्हावा, त्याची स्वप्ने पूर्ण व्हावीत,हे माझे कर्तव्य आहे.”
    समाजातील दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ ठरणे आणि शिक्षणाला प्राधान्य देणे हेच खरे लोकसेवेचे कार्य असल्याचे पुन्हा एकदा डॉ.भैय्यासाहेब पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
    यापूर्वीदेखील त्यांनी शेतकऱ्यांच्या संकटात मदतीचा हात पुढे केला होता.पिंपळगाव येथील विश्वनाथ दातखिळे यांच्या वीस गाई मृत्युमुखी पडल्यावर त्यांना ५१ हजार रुपयांची मदत,तर चिंचपूर येथील अमोल ढगे यांच्या सात गाई गेलेल्या कुटुंबाला ११ हजार रुपयांची मदत केली होती.
    अशा संवेदनशील आणि वेळीच मदतीला धावून येणाऱ्या नेतृत्वामुळे डॉ.प्रतापसिंह पाटील यांची जनतेमध्ये “संकटकाळी आधार देणारे लोकनेते” म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
error: Content is protected !!