कळंब – ग्रामीण जीवन व संस्कृतीवर आपली अमूल्य छाप सोडणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांचे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी,रविवार, दुपारी १.३० वाजता दयानंद हॉस्पिटल,लातूर येथे निधन झाले. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांच्या निधनाने साहित्यजगतासह त्यांच्या अनुयायी आणि मित्रपरिवार मोठ्या शोकात आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कळंब येथील देवमित्रा निवासस्थान आणि पुनर्वसन सावरगाव येथे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यांचा अंत्यसंस्कार कळंब येथील परळी रोडवरील स्मशानभूमीत दुपारी ५.३० वाजता पार पडणार आहे.
प्रा.चंदनशिव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा प्रा.कपिल चंदनशिव,एक मुलगी,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्यांना साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
प्रा.भास्कर चंदनशिव हे ग्रामीण जीवनाचे सूक्ष्म निरीक्षण करीत, लोककथांमध्ये व कविता-साहित्यात मानवतेचे आणि संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करत राहिले.त्यांचा साहित्यिक वारसा कायमच्या स्मरणात राहील.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी