June 25, 2026

विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

  • आष्टा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा (ता.भूम) येथे दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  • कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते क्रांतीवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला.
    या वेळी सहशिक्षक नामदेव अंत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!