August 9, 2026

जय भवानी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

  • वाशी – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी तालुक्यातील पारा येथील जय भवानी विद्यालयात दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘मराठवाडा मुक्ती संग्राम अमर राहो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
    कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे वातावरणात देशभक्तीची ऊर्जा पसरली.
    या प्रसंगी सहाय्यक शिक्षक संदीप भराटे,शितल मेटे,सतीश वाघमारे, दीपक मुरकुटे,विकास माळी, दीपक मुळे,अमोल बांगर,शहाजी सोलंकर,अमोल गवळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
error: Content is protected !!