कळंब – शहरातील आठवडे बाजार मैदानातील माळी लॅब येथे दि.२८ नोव्हेंबर २०२३ रोजी थोर समाज सुधारक,शिक्षण क्रांतीचे उद्गाते,दीनदैलीताचे कैवारी, स्त्रियांचे उद्धारकर्ते क्रांतीबा जोतिराव फुले यांचा १३३ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा डिकसळ ग्रामपंचायत चे उपसरपंच हरिभाऊ कुंभार,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंह राजपूत, ह भ प महादेव महाराज अडसूळ, ज्येष्ठ मार्गदर्शक टी.जी.माळी, राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने, महात्मा फुले क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन राजेंद्र खडबडे, सचिव अरुण माळी, उपाध्यक्ष बिबीशन यादव, यांच्यासह सचिन डोरले बंडू ताठे सोमनाथ तोडकर, अशोक चिंचकर, गोकुळ बरकसे, भारत शिंदे इत्यादी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना संतोष भोजने, अरुण माळी,माधवसिंह राजपूत, महादेव महाराज अडसूळ, सचिन डोरले, बंडू ताटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भोजने यांनी तर आभार प्रदर्शन अरुण माळी यांनी केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात