August 8, 2025

आरक्षण अमलबजावणी संदर्भात घोंगडी बैठक

  • कळंब – दि २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वा शासकीय विश्राम गृह येथे ३० नोव्हेंबर ला उस्मानाबाद येथे होणाऱ्या धनगर एस टी आरक्षण अमलबजावणी मोर्चा संदर्भात सकल धनगर समाज, कळंब च्या वतीने घोंगडी बैठक आयोजित करण्यात आली होती.
    यावेळी धनगर एस टी आरक्षण न्यायालयीन लढाई विषयी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, मुंबई चे संचालक (मराठवाडा विभाग) डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी सविस्तर माहिती दिली. न्यायालयीन लढाई अंतिम टप्प्यात आली असून येत्या ८,११ व १५ डिसेंबर ला मुंबई उच्च न्यायालयात सलग तीन दिवस अंतिम सुनावणी होऊन केसचा निकाल लवकरच धनगरांच्या बाबतीत सकारात्मक लागू शकतो असे त्यांनी संबंधितांना सांगितले.
    धनगर एस टी आरक्षण अमलबजावणी चा मुद्दा गेले ७५ वर्षे प्रलंबित असुन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील लढाई जोर धरू लागली आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या ३० नोव्हेंबर ला उस्मानाबाद येथे जिल्ह्यधिकारी कचेरीवर धनगरांचा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून जवळपास एक लाख धनगर बांधव या विशाल महामोर्च्यात सहभागी होतील असा अंदाज संयोजकां तर्फे व्यक्त केला जात आहे.
    या संबंधी प्रबोधन मंच चे जिल्हाध्यक्ष प्रा.सोमनाथ लांडगे सर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी दिनेश दत्ता बंडगर यांनी तालुका स्तरावरील नियोजन कसे केले आहे या विषयावर मत मांडले, गणेश एडके यांनी गांव पातळीवर जाऊन मोर्चा साठी नियोजना विषयी मार्गदर्शन केले. डॉ.स्नेहा सोनकाटे म्हणाल्या की, निवडनुकापुर्वी जर आरक्षण मिळाले नाही तर धनगरांची मते निर्णायक ठरू शकतात.
error: Content is protected !!