वाशी- ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजी विद्यालय,पिंपळगाव (लिंगी)ता.वाशी येथे शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा ) यांची ३४ वी पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम आण्णांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रशालेचे सांस्कृतीक विभाग प्रमुख सुहास जगताप यांनी आण्णांच्या कार्याविषयी माहिती दिली व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांनी आण्णांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना सखोल व उत्तम मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रशालेचे सहशिक्षक बोडके एस.एम. यांनी आण्णांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.यावेळी प्रशालेतील सहशिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले,शिवराम शिंदे,लहु फुरडे उपस्थित होते.
More Stories
संभाजी विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
विद्यार्थ्यांची तहान भागवली! शिवम बोअरवेल कन्हेरवाडीची निस्वार्थ सेवा; बंद बोअरवेल मोफत दुरुस्त
संभाजी विद्यालयात जिजाऊ–विवेकानंद जयंती उत्साहात साजरी