कळंब – ३० ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांचा ३४ वा स्मृतिदिन व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर क्रेडिट सोसायटी कळंब शाखेचा १३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आल.मल्टीस्टेटचे कळंब शाखा व्यवस्थापक फुलचंद मडके यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मोहेकर गुरुजी यांच्या स्मृतिदिनी ३० ऑगस्ट रोजी मल्टीस्टेटच्या कळंब शाखेची स्थापना झाली असून १३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांच्या मार्गदर्शनात मल्टीस्टेट भरारी घेत असून २६ शाखा सुरू करण्यात आल्या असून राज्यात काळेवाडी पुणे,बार्शी येथे व शेजारी कर्नाटक राज्य बसवकल्याण येथे मल्टीस्टेटच्या शाखा आहेत.परिसरातील सुशिक्षित बेकार,लघुउद्योजक, व्यापारी यांना आर्थिक पाठबळ मिळत आहे. याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रकाश शिंदे,ऑडिटर माणिकराव आरकडे,बाळासाहेब उमाप, माधवसिंग राजपूत,रोहिणी कवडे, योगेश मुळे,तुषार साठे,अनिकेत मडके,धनराज आडसूळ यांची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड