दिल्ली (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा)- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन,नवी दिल्ली तर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली येथील सुपुत्र व समाजसेवक सुफी सय्यद शमशोद्दीन यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल “विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतभूषण सर्वोत्कृष्टता पुरस्कार – २०२५” प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे असून दरवर्षी देशभरातील समाजसेवकांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.यावेळी खासदार प्रतापराव जाधव,डॉ. मनीष गवई,पद्मश्री बी.आर. विधाते,समाजसेविका सुरेखा लामतुरे,रिंकन लाम्हो,सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री विजयलक्ष्मी, महामंडलेश्वर डॉ.वैष्णवी जगदंबा, गिरीराजजी महाराज,विश्व सिंधी सेवा संगमच्या महिला विंगच्या अध्यक्षा डॉ.भारती छाबडिया, पद्मश्री जितेंद्रसिंह छंटी,शक्ति महाराज आदी मान्यवर उपस्थित होते तर सुभाष चांडक,विश्व सिंधी सेवा संगम महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.डेटाराम मनोजा,समन्वयक डॉ. मनीष गवई,राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके तसेच राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सन्मानामुळे सुफी सय्यद शमशोद्दीन यांच्या कार्याला नवे बळ मिळाले असून त्यांच्या कार्याचा गौरव सर्व स्तरावर होत आहे.
More Stories
महिला राज्य संघटक पुरस्काराने पंचशीला कुंभारकर सन्मानीत
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणूका पुढील चार महिन्यात घ्या – सर्वोच्च न्यायालय
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस