March 26, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.21ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा-नियम भंग प्रकरणी एकुण 411 कारवाया करुन 3,59,750 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-जालिंदर रेवण पवार, वय 45 वर्षे, रा. येडोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.21.08.2025 रोजी 11.00 वा. सु लोहगावचे हद्दीत हणमंत बनसोडे यांचे शेताचे शेजारी असलेल्या ओढा पात्रालगत अंदाजे 1,08,000 ₹ किंमतीची 1,800 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • मुरुम पोलीस ठाणे: आरोपी नामे-मुबारक मैनुद्दीन सरसंबे, वय 40 वर्षे, रा. यशवंत नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.08.2025 रोजी 16.30 वा. सु यशवंतनगर कडे जाणारे रोडलगत पश्चिम बाजूच्या पत्राचे शेडसमोर मुरुम येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे: आरोपी नामे-विमल शंकर पवार, झोपडपट्टी शिराढोण ता. कळंब जि. धाराशिव या दि.21.08.2025 रोजी 18.50वा.सु आपल्या राहत्या घरासमोर शिराढोण येथे अंदाजे 5,800 ₹ किंमतीची 100 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व गावठी दारु 30 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-श्रीधर वसंत मंडले, वय 40 वर्षे, रा. कराळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.08.2025 रोजी 18.30 वा. सु कराळी गावातील तळ्याजवळ अंदाजे 3,000 ₹ किंमतीची गावठी दारु 30 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.21.08.2025 रोजी 16.50 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत उमरगा येथील पंतगे रोड रोड काळा मठ बालाजी हॉटेलच्या बाजूला छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गणेश गोपाळ मडोळे, वय 25 वर्षे, रा. पंतगे रोड उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.50 वा. सु. उमरगा येथील पंतगे रोड रोड काळा मठ बालाजी हॉटेलच्या बाजूला येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 840 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.21.08.2025 रोजी 17.00 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत लोहारा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील टपरीवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-मुबारक महेबुब बागवान, वय 35 वर्षे, रा. लोहारा बु. ता. लोहारा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. लोहारा बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील टपरीवर मिलन डे मटका जुगाराचे साहित्य एकुण 660 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.21.08.2025 रोजी 18.20 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत फलोरा चौकामधील पुर्वेकडील बाजूस पत्राचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अजित ज्ञानदेव वाघमारे, वय 28वर्षे, रा. हांडोग्री ता. भुम जि. धाराशिव हे 18.20 वा. सु. फलोरा चौकामधील पुर्वेकडील बाजूस पत्राचे शेडमध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्य एकुण 3,690 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “सदोष मनुष्यवद.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे- प्रकाश प्रभाकर चौधरी, प्रमोद प्रभाकर चौधरी, दोघे रा. पार्डी ता. वाशी जि. धाराशिव यांनी त्यांचे पार्डी शिवारातील मैनाबाई प्रभाकर चौधरी यांचे नावे असलेल्या शेतात उसाचे शेती रानडुकरांपासून संरक्षण करण्याकरीता दोन तारेचे सदर उसाचे शेताला कंपाउंड करुन तारेमध्ये विजप्रवाह सोडून कोणालाही त्याची कल्पना ने देता व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची परवानी न घेता एखाद्याचा जिव जाईल याची जाणीव असताना देखील उसाचे शेतीला लावलेल्या तारेच्या कंपाउंडला करंट दिल्याने मयत नामे- आसित किंकर माल, वय 30 वर्षे, रा. जामबनी, ता. सालबोनी जि. पश्चिम मेदिनीपुर राज्य पश्चिम बंगाल यांना दि.28.06.2025 रोजी 12.00 वा. सु. ते दि. 29.06.2025 रोजी 11.00 वा. सु करंट लागून त्यांचे मरणास कारणीभुत झाले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिशिर ओसीत माल, वय 22 वर्षे, रा. पिऱ्याकटा ता. सालबोनी जि. पश्चिम मेदिनीपुर राज्य पश्चिम बंगाल ह.मु. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.21.08.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 105,3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “गाडीचा हप्ता भरण्यासाठी साथीदारा सोबत केली तारे ची चोरी त्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक.” “पवनचक्की चे ॲल्युमिनियम तार चोरीचे एकूण सहा गुन्हे उघड.”
    दिनांक 21/08/2025 रोजी माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे पेट्रोलिंग करत असताना पथकास गोपनीय बातमीवरून संशयित आरोपी नामे विशाल रामा काळे वय 21 वर्ष रा. पारधी पिढी भुम, जिल्हा धाराशिव याच्याकडे चोरीचा मुद्देमाल असुन सदर मुद्देमाल तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे. अशी बातमी मिळाल्यावर सदर आरोपीस त्याचे पिकअप सह सिताफिने ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याचे वाहनात अल्युमिनियम तारेचे बंडल असल्याचे दिसून आले त्याचे कडे सदर बाबत चौकशी केली असता त्याने सदरच्या ॲल्युमिनियम च्या तारा कळंब व वाशी तालुक्यातील बावी, सरमकुंडी, मस्सा शिवारातून पवनचक्कीच्या खांबांवरून चोरी केलेल्या असल्याची कबुली दिली . त्यावरून धाराशिव जिल्हा गुन्हे अभिलेख तपासला असता अशा प्रकारच्या चोरीचे 06 गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले. त्यावरून तात्काळ पंचनामा करून एकूण 898 मीटर लांबीच्या 02,69,400 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा आणि गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन किंमत 5,00,000 रुपये असा एकूण 07,69,400 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने त्याच्या अन्य साथीदारांची नावे तसेच चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत माहिती दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या ॲल्युमिनियम तारा चोरीचे एकूण 06 गुन्हे उघडकीस आले आहेत. ताब्यात असलेल्या आरोपीने त्याच्या अन्य साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केल्याचे कबुली दिल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करून रिपोर्ट सह पोलीस ठाणे, वाशी येथे पुढील कारवाई कामी हजर केले आहे.
    सदरची कामगीरी मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हावलदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फराहान पठाण, चालक पोलीस अमंलदार रत्नदीप डोंगरे, नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!