June 19, 2025

महिला राज्य संघटक पुरस्काराने पंचशीला कुंभारकर सन्मानीत

  • दिल्ली (दिलीप आदमाने) – नॅशनल फॉउंडेशन फॉर इंडियाने भारतरत्न सी.सुब्रमण्यन कन्म्युनिटी लीडरशिप पुरस्कार १०२४-२५ पुरस्कार वितरण सोहळा दि.२३ मे २०२५ रोजी हेबिडेड सेन्टर दिल्ली संपन्न झाला.भारतातील अनेक राज्यातील सामाजिक न्यायासाठी काम करणाऱ्या १४ सामाजिक कार्यत्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्रातून या पुरस्कारासाठी पंचशीला कुंभारकर नॅशनल दलित मोमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या महिला राज्य संघटक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.सदर पुरस्काराचे स्वरूप शिल्ड, प्रमाणपत्र व एक लाखाचा धनादेश असे आहे.
    सदर पुरस्कारासाठी संघटनेचे महाराष्ट्राचे महासचिव डॉ.ॲड. केवलजी ऊके,वैभवजी गीते यांनी नावाची नावाची शिफारस केली होती.संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ.ॲड.केवळ जिवते,वैभव गीते यांचे मनापासून अभिनंदन केले असून सामान्य कार्यकर्त्यांना घेऊन जाणारे ॲड.केवल ऊके,वैभव गीते यांचे सर्व पदाधिकारीच्या वतीने हार्दिक अभिनंदन NCDHR -NDMJ च्या जनरल सेक्रेटरी बिनाताई पेल्लिकल, ग्रीजेश ताई व देबजानी ताई यांचे या सर्वांचे अभिनंदन पंचशीला कुंभारकर महिला संघटक एनडीएमजी यांनी शतशः आभार मानून तळागाळातील कार्यकर्त्यांना माणसं मनाची वागणूक देणारे संघटनेचे सर्व केवळ जीके,वैभवजी गीते व सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. सर्व कार्यकर्तेच्या वतीने पंचशीला कुंभारकर यांना त्यांच्या पुढील विषयास शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या अभिनंदन केले आहे. त्यांनी केलेल्या निस्वार्थपणे केलेल्या कामात पोच पावती म्हणून हा पुरस्कार मिळाला आहे असे मत ताईंनी व्यक्त केले आहे. हा पुरस्कार मिळण्यासाठी यासारखा मोठा पुरस्कार मिळवण्यासाठी माझ्यात ही ज्याने ऊर्जा निर्माण केली माझे वरिष्ठ डॉ.ॲड.केवल उके,वैभव तानाजी गीते यांचेही विशेष आभार मी मानते.तर कायमच मला माझ्या कामात मदत करणारे माझे जेष्ठ मार्गदर्शक. शिवराम कांबळे,पी.एस.खंदारे व माझ्या NDMJ महाराष्ट्र टीममच्या सर्वांचे आभार कारण वरिष्ठानचे नेतृत्व,मार्गदर्शन व सहकार्य या शिवाय हे कधीच शक्य नव्हते.तसेच विशेष आभार माझ्या कुटुंबाचे – माझे पती ॲड.राजेश कुंभारकर व माझी मुलं प्रथम,श्वेता व सम्यक व माझे जाऊबाई व दीर यांचे.ह्यांच्या सहकार्याशिवाय मी काहीच नाही.आणि आज जी आहे ती फक्त यांच्यामुळेच आहे तसेच त्याने त्यांचे पती व कुटुंबाचे विशेष आभार मानले.त्यांना पुढील आयुष्यात शुभेच्छा व अभिनंदन त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!