लातूर – रोटरी ही आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था असून संपूर्ण जगामध्ये पोलिओ निर्मूलनाचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेने केले आहे. रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन तर्फे रोटरी वर्ष २०२३-२४ मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२च्या प्रांतपाल रो.स्वाती हेरकल आणि सहाय्यक प्रांतपाल डॉ.बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार रोटरी क्लब ऑफ लातूर होरायझन तर्फे “लेक माझी भाग्याची” अभियानांतर्गत लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभागात बाळाला नवीन कपडे आणि आईला प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी रोटरी क्लब लातूर होरायझनचे अध्यक्ष रो. विश्वनाथ स्वामी (सावळे), सचिव रो. महादेव पांडे, प्रोजेक्ट चेअरमन माजी उपप्राचार्य प्रा. बी. एस. पणूरे, प्राचार्य डॉ. संजय गवई, डॉ. गुणवंत बिरादार, युनिट इन्चार्ज डॉ. रामदास पांचाळ, लेखापाल आकाश वेदपाठक, अधिपरिचारिका संध्या साखरे, डॉ. चैत्राली शिंदे आणि डॉ. ऐश्वर्या भंडारी यांची उपस्थिती होती. यावेळी पुनम कदम (नादुर्गा), रूपाली कदम (ढाळेगाव), अंजली पवार (एकुर्गा), गीतांजली पोद्दार (शिराळा), अश्विनी वरवटे (आमसखेडा), अंजली भालेराव (आजनसोंडा), सुजाता जामकर (बाभळगाव), अन्वरबी पठाण (लातूर), दिव्या डोलारे (सोनचिंचोली), जरीना कोकासुरे (कासार शिरशी), कुसुम सुरवसे (लातूर), मीना जाधव (लातूर) आणि गायत्री किसे (हनुमंतवाडी) आदि महिलांना प्रमाणपत्र तर त्यांच्या बाळासाठी नवीन कपडे देण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. संजय गवई आणि प्रोजेक्ट चेअरमन माजी उपप्राचार्य प्रा. बी. एस. पणूरे यांनी मनोगते व्यक्त करून शासकीय रुग्णालयातील सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गुणवंत बिरादार यांनी केले. तर प्रास्ताविक अध्यक्ष रो. विश्वनाथ स्वामी (सावळे) यांनी केले आणि आभार रो. महादेव पांडे यांनी केले. या कार्यक्रमाला शासकीय रुग्णालयातील महिला, बालके आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊराव यादव,रशिदा मावशी आणि शाहीन मावशी यांनी सहकार्य केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन