कळंब (राजेंद्र बारगुले ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेतून व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे आयोजित वार्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. प्रथम वर्षात प्रीती रमेश महाद् वार हिने ८४.००% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.तसेच साक्षी संतोषराव कवडे हिनेही ८०.६०% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षात नेहा हरिश्चंद्र शिरसट हिने ८२.७५% गुण प्राप्त करत द्वितीय क्रमांक,तर साक्षी काकासाहेब वाघमारे ८०.२५% हिला उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाला. या यशस्वी छात्राध्यापकांचा दि.७ ऑगस्ट २०२५,गुरुवार रोजी विद्यालयात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत प्राचार्य सतिश मातने,प्रा.श्रीकांत पवार, प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,भैरवनाथ आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे, राजकुमार शिंदे,निदेशिका कोमल मगर, आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड, विनोद कसबे व सर्व छात्राध्यापक उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट