August 8, 2025

शिक्षणमहर्षीं ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त बँक व अग्रो इंडस्ट्रीजच्या वतीने वृक्षारोपण

  • मोहा – शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त दि.२७ जुलै २०२५ वार रविवार रोजी शि.म.ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को.ऑप.बँक लि.व शि.म.ज्ञानदेव मोहेकर अग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या मुख्य कार्यालयात गुरुजींच्या प्रतिमेचे पूज चेअरमन हनुमंत (तात्या) मडके यांच्या हस्ते करण्यात आले.
    गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ मोहा परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
    याप्रसंगी बँकेचे मुख्य अधिकारी, कर्मचारी व अग्रो इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे संयोजन सामाजिक बांधिलकी जपत गुरुजींच्या विचारांना अभिवादन करण्याच्या हेतूने करण्यात आले.

error: Content is protected !!