“शिक्षणमहर्षींच्या स्मृतीस वाहिलेली साहित्यिक आदरांजली”
कळंब (विशाल पवार) – शिक्षण हे केवळ विद्येचे साधन नसून,समाजपरिवर्तनाचे बळ आहे,या दृढ श्रद्धेने आपले संपूर्ण आयुष्य ग्रामीण भागातील सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनासाठी समर्पित करणारे ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त सा.साक्षी पावनज्योतचा जन्मोत्सव विशेषांक – २०२५ प्रकाशन समारंभ दिनांक २७ जुलै २०२५ रोजी शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे उत्साहात पार पडला.
या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थान व विशेषांक प्रकाशनाचे मुख्य अतिथी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव तथा मार्गदर्शक डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ)मोहेकर,सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष घोडके,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडूआबा ताटे,तसेच ज्ञान प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.डॉ.डी.एस.जाधव,संचालक अंकुश गव्हाणे,संचालक ॲड.वसंत मडके,डॉ.संजय मिटकरी,सा.प्रा.श्रीहरी बोबडे,प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,संभाजी विद्यालय जवळा (खुर्द)चे मुख्याध्यापक संभाजी गिड्डे,विद्याभवन हायस्कूल मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,जय भवानी विद्यालय पारा मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी,प्रा.राहुल भिसे,प्रा.नवनाथ करंजकर,अनिल पवार,सा.साक्षी पवनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके,पत्रकार परमेश्वर खडबडे,पत्रकार विशाल पवार सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले