आष्टा – भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूलमध्ये आज गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी शिक्षण महर्षी कै. ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी सहशिक्षक नामदेव अंनत्रे, शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आणि इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या प्रकाशवाटेने मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षण महर्षींचे स्मरण करून त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आदर्श घेण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
ग्रामीण भागात ज्ञानदीप पेटवणाऱ्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्यामंदिर हायस्कुल आष्टा येथे अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन